Pioneers Digital Marketing logoPIONEERSDIGITAL MARKETING
92092 19036

काम एक नंबर करता, पण नवीन प्रोजेक्टच येत नाहीत?

काम बघितलेला प्रत्येक जण कौतुक करतो, ओळखीतून एखादं काम मिळतं — पण पुढच्या प्रोजेक्टचा पत्ता नसतो. आम्ही परभणीतल्या इंटिरिअर आणि फर्निचर व्यवसायांसाठी Facebook & Instagram वर जाहिरात चालवतो — तुमचं आधीचं काम दाखवून, फक्त तुमच्या परिसरातल्या लोकांना. प्रोजेक्ट चौकशा थेट तुमच्या WhatsApp वर.

पहिलं बोलणं पूर्ण Free — 10 मिनिटांत Reply, तेही मराठीत.

इंटिरिअर & फर्निचर

23+

Local Business

7 दिवस

पहिला Result

100%

Refund Guarantee

नवीन चौकशी

आत्ताच · WhatsApp वरून

नमस्कार, तुमची जाहिरात बघितली. माहिती मिळेल का?
हो, नक्की! नाव आणि गाव सांगा — लगेच सगळं पाठवतो 👍

यापैकी एक जरी खरं असेल, तर वाचा

  • एका महिन्यात तीन प्रोजेक्ट, मग दोन महिने शांतता — चौकशांचा काही भरवसाच नाही
  • "अंदाजे किती खर्च येईल?" विचारणारे दहा, त्यात बजेटवाला एखादाच — बाकीचे फक्त वेळ खातात
  • लाखोंचं किचन बनवून दिलं, पण फोटो तुमच्या फोनमध्येच — नवीन गिऱ्हाईकाला काम दिसतच नाही
  • काम न बघताच लोक विचारतात "स्वस्तात होईल का?" — कारण तुमची क्वालिटी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही
  • Instagram वर पुण्या-मुंबईचे डिझायनर दिसतात, तुमचं तितकंच चांगलं काम मात्र कोणी बघतही नाही

प्रॉब्लेम तुमच्या कारागिरीचा नाही. मार्केटिंगचा आहे.

कागद फेकला जातो. Mobile हातातच राहतो.

एक प्रामाणिक प्रश्न — गेल्या महिन्यात तुमच्या स्वतःच्या हातात किती Pamphlet पडले? त्यातलं एक तरी तुम्ही वाचलं का?

तुमचं Pamphlet ही तसंच गेलं. चूक तुमची नाही — कागदाची आहे.

एकच फरक — कोणाला, कधी आणि किती वेळा दिसतं.

Pamphlet / Banner

META ADS

कोणाच्या हातात गेलं माहीत नाही

Age, गाव, आवड — निवडून दाखवतो

एकदा दिसतं, दुसऱ्या दिवशी विसरलं जातं

एकाच माणसाला 5–7 वेळा — नाव लक्षात राहतं

किती लोकांनी पाहिलं? फक्त अंदाज

रोजचा आकडा Mobile वर

Printing झाली की Change नाही

चालत नसेल तर त्याच दिवशी Change

वाटणारा पोरगा गेला की संपलं

30 दिवस, रात्री 11 लासुद्धा चालू

₹8,000 चं Pamphlet = एक दिवस, अंदाजे views.
₹8,000 ची Ad = 30 दिवस, 60,000+ Local views — मोजून.

फक्त “Post टाकणे” नाही. ठरलेली Process.

Customers येणं हा नशिबाचा खेळ नाही. 5 Step चं काम आहे. एक Step सोडली, तर पुढचं सगळं फुकट जातं.

1

तुमचा Business आणि Problem समजून घेणं

Ad चालवण्याआधी हे कळायला हवं — तुमचं Customer कोण आहे, ते आज कुठून येतं, आणि Enquiry नेमकी कुठे थांबते. काही Business मध्ये Marketing कमी पडते, काहींत Enquiry येते पण Follow-up होत नाही. दोन्हीचा उपाय वेगळा.

2

Strategy ठरवणं

कोणती Offer, कोणत्या Age Group ला, कोणत्या गावात, किती किमी Radius मध्ये, Budget कुठे — सगळं आधी कागदावर ठरतं. तुमच्या Business ला जे लागेल तेच. दुसऱ्याचा Plan Copy करून चालत नाही.

3

Script आणि Content Plan

Ad मध्ये काय बोलायचं आणि कोणत्या शब्दांत — त्याची Script आम्ही मराठीत लिहितो. तुमच्या Customer च्या भाषेत, पुस्तकी मराठीत नाही. महिन्याभराचा Content Calendar आधीच तयार.

4

Shoot आणि Creative

आमची Team तुमच्या दुकानात, Clinic मध्ये किंवा School मध्ये प्रत्यक्ष येते. Photo, Reel, Video Shoot करतो. Stock Photo वापरत नाही — Ad मध्ये तुमचं खरं दुकान आणि खरी माणसं दिसतात, म्हणून लोकांना ओळख पटते.

5

Campaign Live + WhatsApp System

Ad Live होते. ती बघून माणूस थेट तुमच्या WhatsApp वर Message करतो — Form भरायचा नाही, Call करायची भीती नाही. Auto-reply आणि Follow-up Reminder Set केलेले असतात. रात्री 11 ला Message आला तरी Reply जातो.

परभणीतले Business आधीच आमच्यासोबत आहेत.

मुंबई-पुण्याची उदाहरणं नाहीत. नावं, आकडे आणि माणसं — सगळं इथलंच. Call करून विचारू शकता.

बाल विद्या वर्धिनी English School

परभणी

₹3 लाख+ Business

एका Admission Season मध्ये

डॉ. विवेक नावंदर, Owner

डॉ. विवेक नावंदर, Owner

परभणी ICU & Trauma Care

परभणी

100+ Leads

Health Camp आणि इतर Medical Services साठी

रोहिणी देशमुख, Director

रोहिणी देशमुख, Director

सुवर्ण साज

1 Gram Jewellery, परभणी

10X ROI

जाहिरातीवर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयावर

संकेत सराफ, Owner

आणि अजून 20+ Local Client — School, Hospital, Showroom, Gym, Service Business.

Screenshot आणि Client चे Number WhatsApp वर मागून घ्या — आम्ही पाठवतो. स्वतः Call करून विचारा. आम्ही थांबवणार नाही.

तुमचा Business वेगळा. मग Plan एकसारखा का?

प्रत्येक Business वेगळा. School ला Admission Season मध्ये जे लागतं, ते Jewellery Shop ला लग्नसराईत लागत नाही. Hospital ची गरज तिसरीच. म्हणून आम्ही एकच Package सगळ्यांना विकत नाही — तुमच्या Business चं Audit करून Plan बनवतो.

Plan मध्ये काय काय असू शकतं

  • Business Audit आणि Local Growth Plan
  • Meta Ads (Facebook + Instagram) — Setup, Targeting, रोजचं Management
  • मराठी Script + महिन्याभराचा Content Calendar
  • दुकानात/Clinic मध्ये येऊन Photo & Reel Shoot
  • दर महिन्याला नवीन Creative
  • WhatsApp Lead System + Auto-reply + Follow-up
  • एका पानाचं Landing Page (गरज असेल तर)
  • Google Business Profile Setup
  • दर आठवड्याला मराठीत Report + Call

यातलं तुमच्या Business ला काय लागेल आणि काय नाही — हे पहिल्या Call मध्येच स्पष्ट सांगतो. नको असलेलं विकत नाही.

Ad Budget वेगळा. तो थेट Meta ला जातो, आम्हाला नाही.

FREE

FREE — आधी 15 मिनिटांचा Business Audit. काय चुकतंय ते सांगतो, पैसे नाहीत.

माझ्या Business ला काय लागेल? — विचारा

Leads नाही? पैसे नाही.

पहिल्या महिन्यापासूनच नवीन Enquiry येणं सुरू होईल. आणि जर आल्याच नाहीत — तर एक रुपयाही देऊ नका. 100% Refund. अट नाही, वाद नाही, कागदी शब्द नाहीत. तुम्ही आधी एकदा Marketing वर पैसे घालवून फसला असाल — परत तसं होऊ नये म्हणून Risk आम्ही घेतो, तुम्ही नाही. Ad Budget मात्र Meta चा असल्याने तो Refund करता येत नाही.

Lead = Target परिसरातल्या माणसाकडून तुमच्या Service बद्दल आलेला Message किंवा Call.

No Lock-in

महिन्या-महिन्याने. कधीही थांबवा.

Account तुमचंच

Page, Ad Account, Data — सगळं तुमच्या नावावर.

चार पावलं. पहिल्या आठवड्यात सुरू.

  1. 1

    Discovery Call

    तुमचा Business कोणता, Customer कोण, आणि सध्याची Marketing Problem काय — 15 मिनिटं. विकायचा दबाव नाही.

  2. 2

    Plan + Shoot

    तुमच्यासाठी Plan तयार करतो. मग दुकानात/Clinic मध्ये येऊन Photo, Reel आणि Video Shoot.

  3. 3

    Account Setup + Ads Live

    Facebook Page, Instagram, Ad Account, WhatsApp System — सगळं तुमच्या नावावर Setup करतो. Ad 3–5 दिवसांत Live.

  4. 4

    दर आठवड्याला Optimization

    जे चालतंय त्यावर जास्त Budget, जे नाही ते बंद. दर आठवड्याला मराठीत Weekly Report तुमच्या WhatsApp वर.

तुम्हाला एकही Technical गोष्ट शिकावी लागणार नाही. फक्त येणारे Message बघा आणि Call उचला. बाकी सगळं आमचं.

Pioneers Digital Marketing

Client च्या ROI वर लक्ष ठेवणारी Agency. Likes नाही — Customers.

माधव शर्मा

माधव शर्मा

CEO & Founder

अनंत कुलकर्णी

अनंत कुलकर्णी

Co-founder & CTO

आम्ही परभणीतलेच. तुमचा Call थेट Founders उचलतात — आणि Report खरे असतात. काम एकच: Local Business ला Online Customers मिळवून देणं. आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब देणं.

3+ वर्षं

Experience

₹40 लाख+

Meta Ads Spend Managed

Result-Oriented

Creative Marketing साठी ओळख

मराठी

बोलणं, Report, Creative

विचारण्याआधीच उत्तरं

माझा Business छोटा आहे, हे परवडेल का?

छोट्या Budget पासून सुरू करता येतं. दिवसाला जेवढा खर्च होतो, तेवढ्यात रोज शेकडो Local लोकांपर्यंत पोहोचता येतं — आणि किती पोहोचलं ते मोजून सांगता येतं. पहिल्या Call मध्ये तुमच्या Business ला किती लागेल ते स्पष्ट सांगतो.

माझं Instagram Page च नाही, चालेल का?

आम्ही Facebook Page, Instagram आणि Ad Account सगळं तुमच्या नावावर बनवून देतो. तुम्हाला काहीही Technical करावं लागत नाही.

मला Mobile-Computer नीट येत नाही.

काहीच अडचण नाही. तुमचं काम एवढंच — WhatsApp वर आलेला Message वाचा आणि Reply द्या. बाकी सगळं आम्ही सांभाळतो.

Result किती दिवसांत दिसेल?

पहिले Message साधारण 5–7 दिवसांत. खरा फरक 30 दिवसांनंतर — कारण तोपर्यंत कोणती Ad चालते ते Data वरून कळतं. आम्ही खोटी घाईची आश्वासनं देत नाही.

आधी एकाने Ads चालवले, पैसे वाया गेले.

बहुतेक वेळा “Boost Post” दाबलं जातं — त्याने Likes येतात, Customers नाही. आम्ही Lead Campaign चालवतो आणि प्रत्येक रुपयाचा हिशोब Report मध्ये देतो.

फॉर्म भरा. तुमचा प्लॅन तयार होतो.

2 मिनिटांचा फॉर्म — तुमच्या उत्तरांवरून तुमच्या व्यवसायासाठी नक्की काय चालेल ते ठरवतो, आणि कॉलवर फुकट सांगतो. कोणतीही फी नाही, कोणतंही बंधन नाही.

पायरी 1/5तुमची माहिती20%

तुमची माहिती फक्त आमच्याकडे राहते. कोणालाही दिली जात नाही.

10 — शेवटचं

पुढचं मोठं काम पण दुसऱ्याकडेच जाऊ द्यायचं?

15 मिनिटं बोला. काय चुकतंय ते फुकट सांगतो. पटलं तरच पुढे.

PIONEERS DIGITALपरभणी, महाराष्ट्र

© 2026 Pioneers Digital Marketing · pdmasolutions@gmail.com

☎ कॉल कराWhatsApp करा